चिपळूण येथील साधिका कु. सायली सुरेश घाडे यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१. ‘नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसतात आणि लगेचच दुसर्या क्षणी सद्गुरु सत्यवान कदम दादा यांचे चरण दिसतात.
२. नामजप करतांना अहं वाढू नये; म्हणून परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे
नामजप करत असतांना ‘परात्पर गुरु माझे कौतुक करत आहेत’, असे जाणवते. तेव्हा मला पुष्कळ आनंद वाटतो आणि दुसर्या क्षणी माझा अहं वाढायला नको; म्हणून पुढील प्रार्थना होते, ‘परात्पर गुरुदेवा, सर्वकाही तुम्हीच करून घेता आणि मग माझे कौतुक का करता ? माझे कौतुक करू नका. मला केवळ तुमच्या चरणांची धूळ बनून रहायचे आहे.’
३. ‘आध्यात्मिक पातळी गाठायला पाहिजे’, अशी अपेक्षा नसणे
दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून सतत आपत्काळाविषयी सांगितले जाते, ‘आपत्काळात जगण्यासाठी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आवश्यकता आहे, तरच आपण जगणार आहोत.’ त्या वेळी मनात आले, ‘आपली तेवढी पातळी कधी होईल’, हे ज्ञात नाही. ‘होईल किंवा नाही ?’, हे सुद्धा ठाऊक नसते’; मात्र ‘पातळी गाठायला पाहिजे’, अशी अपेक्षा नाही.’
४. परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण दिसणारा प्रत्येक क्षण मोक्षच असल्याचे जाणवणे
ज्या ज्या क्षणी परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण दिसतात, तो तो प्रत्येक क्षण, म्हणजे मोक्षच आहे. त्या प्रत्येक क्षणी आपल्याला मोक्षच मिळतो. एवढेच पुष्कळ झाले.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला या अनुभूती अनुभवायला मिळाल्या. याविषयी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. सायली सुरेश घाडे, चिपळूण (जिल्हा) रत्नागिरी (९.६.२०१९)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |