सनातनचे बालक संत पू. वामन राजंदेकर यांचे स्वप्नात झालेले दर्शन आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर स्थुलातून, तसेच स्वप्नातही संतदर्शन करून देतात’, याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता
१. रामनाथी आश्रमात साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी पू. वामन आले असून त्यांचा आशीर्वाद मिळावा; म्हणून थोडे झुकल्यावर त्यांनी डोक्यावरून दोन्ही हात फिरवल्याचे स्वप्नात दिसणे
‘२९.१०.२०२० या दिवशी मला एक स्वप्न पडले, ‘सनातनचे बालक संत पू. वामन राजंदेकर (वय २ वर्षे) रामनाथी आश्रमात आले आहेत. ते त्यांच्या आईच्या (सौ. मानसीताई यांच्या) कडेवर बसून मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आले असून पू. वामनदादांना घेऊन सौ. मानसीताई माझ्याजवळ आल्या आहेत. तेव्हा मी त्यांचा आशीर्वाद मिळावा; म्हणून माझे हात जोडले आणि थोडा झुकलो. तेव्हा पू. वामन यांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या डोक्यावरून फिरवले. नंतर मी त्यांचे चरण हातात घेतले आणि त्यांना नमस्कार केला. थोड्या वेळाने मी उभा राहिलो. तेव्हा ‘ते स्मितहास्य करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
२. स्वप्नात ‘पू. वामन आणि सौ. मानसीताई यांना बसण्यासाठी आसन दिले नाही’, ही चूक लक्षात येऊन झोपेतून जाग येणे
तेवढ्यात माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला संतांचे दर्शन झाले आणि त्यांनी मला आशीर्वादही दिला. मी मात्र पू. वामन आणि सौ. मानसीताई यांना बसण्यासाठी आसन दिले नाही किंवा त्यांना त्याविषयी विचारलेही नाही.’ ‘माझ्याकडून ही अक्षम्य चूक झाली’, या विचाराने माझ्या शरिराला कंप सुटला आणि माझी चूक लक्षात येऊन मला चटकन जाग आली.
३. ‘संतांची सेवा करण्यात न्यून पडलो’, अशी खंत वाटून परात्पर गुरु डॉक्टरांची क्षमा मागणे
नंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ गेलो आणि ‘तुम्ही मला संतदर्शन घडवले; पण त्यांची सेवा करण्यात मी न्यून पडलो’, अशी त्यांची क्षमा मागितली. त्या वेळी घड्याळात पाहिले, तर पहाटेचे ५ वाजले होते. ‘मी स्वप्नात होतो’, हे मला जाग आल्यावर समजले. तोपर्यंत ‘मी हे सर्व प्रत्यक्षच अनुभवत आहे’, असे मला वाटत होते.
स्थुलासह सूक्ष्मातूनही (स्वप्नातही) संतांचे दर्शन घडवून त्यांचे आशीर्वाद मिळवून देणार्या परात्पर गुरुदेवांच्या चरणी आणि पू. वामनदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो !’
– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |