कमरेला देण्याचे ‘इंजेक्शन’ हाताला दिल्याने हात लुळा पडला !
५ मासांपासून अधिकार्यांचे उंबरठे झिजवतो; पण न्याय मिळाला नाही – ग्रामस्थाची व्यथा
- नर्सच्या हलगर्जीपणामुळे पिंपळकर यांची झालेली शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी कोण भरून देणार ? पिंपळकर यांच्यासारख्या सामान्य माणसावर अन्याय झाला, तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आरोग्य केंद्राचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन साहाय्य करायला हवे !
- पिंपळकर यांनी तक्रार करूनही दाद न देणार्या अधिकार्यांवरही कडक कारवाई व्हायला हवी !
- आधुनिक वैद्य किंवा नर्स यांच्या चुकीमुळे पीडित रुग्णांची झालेली हान भरून निघण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यायला हवे !
वणी (यवतमाळ), १७ सप्टेंबर (वार्ता.) – कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पठारपूरचे ग्रामस्थ पंढरी पिंपळकर हे हात-पाय दुखतात म्हणून दाखवायला गेले. आधुनिक वैद्यांनी पडताळून इंजेक्शन आणायला सांगून, परिचारिकेला ते कमरेत द्यायला सांगितले. परिचारिकेने ते दंडात दिले. त्यानंतर काही वेळातच पिंपळकर यांचा हात काम करेनासा झाला. परिचारिकेने चूक मान्य केली; मात्र हात लुळा झाल्याने कुटुंबातील कर्ता व्यक्ती अपंग झाला. पिंपळकर न्याय मिळावा म्हणून ५ मासांपासून अधिकार्यांचे उंबरठे झिजवत आहेत; मात्र न्याय मिळाला नाही; म्हणून ते हतबल झाले आहेत.