पत्रकार नीलेश पाटील यांना मातृशोक
नवी मुंबई – पत्रकार नीलेश पाटील यांच्या मातोश्री सुशीला राजपूत (पाटील) यांचे अल्पशा आजाराने १४ सप्टेंबर या दिवशी कोपरखैरणे येथे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, २ सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोपरखैरणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी धुळे जिल्ह्यातील दह्याने या मूळ गावी येत्या २४ सप्टेंबर या दिवशी सकाळी नऊ वाजता होणार आहे.