औषधी वनस्पतींच्या लागवडीचे आमीष दाखवत ५०० हून अधिक शेतकर्यांची २३ कोटी रुपयांची फसवणूक !
लुबाडली गेलेली रक्कम आरोपीकडून लवकरात लवकर वसूल करून घ्यायला हवी ! – संपादक
पुणे, १७ सप्टेंबर – ‘शून्य हर्बल अॅग्रो डेव्हलमेंट’ या आस्थापनाद्वारे शतावरी, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींच्या लागवडीचे आमीष दाखवून ऋषिकेश पाटणकर यांनी शेतकर्यांची २३ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी राहुल शहा यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. आरोपीने पुणे, सोलापूर, रायगड यांसह अन्य जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शेतकर्यांची फसवणूक केली आहे.
शेतात औषधी वनस्पतींची रोपे, लागवड, खत पुरवठा, देखरेख या सुविधांसह १ वर्षाने पीक जागेवर विकत घेण्याचे आमीष शेतकर्यांना दाखवण्यात आले होते. पाटणकर यांनी शेतकर्यांना एकरी ५० सहस्र रुपये आस्थापनामध्ये गुंतवण्यास भाग पाडले होते.