पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी घेतली नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट !
सातारा, १७ सप्टेंबर (वार्ता.) – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे(गुरुजी) यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब येथे अनुमाने १ घंटा बंद खोलीत चर्चा झाली; मात्र त्यातील तपशील समजू शकला नाही.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हा आगामी नगरपालिका निवडणुका आणि मराठा आरक्षण यांविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते; मात्र दुसर्याच दिवशी पू. संभाजीराव भिडे(गुरुजी) यांनी शिंदे यांची भेट घेतल्यामुळे चर्चा होत आहे. पू. भिडेगुरुजी यांच्याकडून भेटीचे कारण समजले नसले, तरी मंत्री शिंदे यांनी पू. गुरुजींनी सदिच्छा भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे.