अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला लाल फूल वहाणे, दुसर्या दिवशी ‘ते फूल बाजूला होऊन गणपतीच्या चरणांजवळ जास्वंदीची दोन फुले दिसणे’
‘अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मी पूजा करून गणपतीला लाल फूल वाहिले. नंतर दुसर्या दिवशी सकाळी मी देवाला नमस्कार करण्यासाठी गेले, तेव्हा मी आदल्या दिवशी गणपतीला वाहिलेले लाल फूल बाजूला झाले होते आणि गणपतीच्या चरणांजवळ जास्वंदीची दोन फुले होती. मी अवाक होऊन पहात राहिले. मला त्यामागचे कारण उलगडले नाही. नंतर माझ्या मनात विचार चालू झाले, ‘एवढ्या सकाळी फुले कुणी वाहिली ? घरात तर कुणीच नाही.’ त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘हा अंगारकी चतुर्थीचा गणपतीने दिलेला प्रसाद आहे.’ ती प्रसादरूपी फुले रात्रीपर्यंत ताजी राहिली होती.’
– श्रीमती सुमन मुक्कावार, गेवराई, बीड. (२२.७.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |