व्यावसायिकाकडे ५ लाखांची खंडणी मागणार्या पत्रकारास अटक !
पत्रकारांनी खंडणी मागणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! – संपादक
पुणे, १७ सप्टेंबर – तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत असल्याचे सांगत व्यावसायिकाकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्रकार अर्जुन शिरसाट यांना १६ सप्टेंबरच्या रात्री अटक केली. या प्रकरणी एका व्यावसायिकाने तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदारांच्या दुकानातील सिगारेट, बडीशेप, बिडी, गोळ्या अशा मालाची वाहतूक चालक टेम्पोतून करत असतांना पत्रकाराने टेम्पो अडवला आणि तक्रारदाराला भ्रमणभाषवरून धमकी देत खंडणी मागितली.