जावळी (जिल्हा सातारा) येथील वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
वासनांधतेने परिसीमा गाठल्याचे उदाहरण !
सातारा, १७ सप्टेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यात एका ६५ वर्षीय वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर बळजोरी करत तिचे लैंगिक शोषण केले. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयितास पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
संशयिताने मुलीला बळजोरीने पकडून शेतात नेले. तेव्हा पीडित मुलीसमवेत असलेली तिची मैत्रीण तेथून पळून गेली. नंतर वृद्धाने मुलीवर बळजोरी केली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर वृद्ध तेथून पळून गेला. पीडित मुलीने आजीला घडलेली घटना सांगितली. आजीच्या तक्रारीवरून वृद्धाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.