५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिरवळ (जिल्हा सातारा) येथील कु. स्वामिनी रवींद्रनाथ परब (वय १५ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !
शिरवळ (जिल्हा सातारा) येथील कु. स्वामिनी रविंद्रनाथ परब हिचा आज भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशी (१७ सप्टेंबर २०२१) या दिवशी १५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई सौ. विनीता परब यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. कु. स्वामिनी हिचे आई-वडील हिंदुत्वनिष्ठ असून ते हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून संपर्कात आले आहेत. ते दोघेही साधना करतात. त्यांच्यातील तळमळीमुळे ते रहात असलेल्या वसाहतीत त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू केला आहे.
कु. स्वामिनी रवींद्रनाथ परब हिला पंधराव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
‘मी गर्भवती असतांना संत गजानन महाराज यांचा ‘गजानन विजय’ हा ग्रंथ वाचला होता.
२. वेदनारहित प्रसुती होणे आणि बाळाने यजमानांकडे पाहून गोड स्मितहास्य करणे
स्वामिनीच्या जन्माच्या वेळेस मला फारशा वेदना झाल्या नाहीत. मी नामजप करत असतांनाच तिचा जन्म झाला आणि १० मिनिटांतच आधुनिक वैद्य तिला घेऊन बाहेर आले. त्यांनी बाळाला यजमानांच्या हातात दिले. तेव्हा तिने एक गोड स्मितहास्य केले. ते पाहून आधुनिक वैद्यांनीही तिचे कौतुक केले.
३. जन्मानंतर
३ अ. जन्म ते १ वर्ष
३ अ १. शांत स्वभाव : स्वामिनी जन्मापासूनच शांत आहे. तिला लस किंवा कुठलेही औषध दिले, तरी ती त्रास द्यायची नाही. ती ६ मासांची असतांना मी तिला सद्गुरु वामनराव पै यांच्या प्रवचनांना न्यायचे. तेव्हा पूर्ण प्रवचन संपेपर्यत ती शांत रहायची.
३ अ २. तिच्या तोंडवळ्यावर नेहमीच स्मितहास्य असते आणि तेज जाणवते.
३ आ. वय – २ ते ६ वर्षे
३ आ १. उत्तम स्मरणशक्ती : लहान असल्यापासून स्वामिनीला संस्कृत श्लोक, आरती आदी सर्व पाठ आहे. ती ४ वर्षांची असतांना तिचे वडील तिला श्लोक म्हणायला शिकवायचे. तेव्हा तिने ते लगेच पाठ केले होते. ती ‘मनाचे श्लोक’ या पाठांतर स्पर्धेत सहभागी झाली होती आणि तिचा प्रथम क्रमांक आला होता. त्या वेळी विद्यालयातील शिक्षकांनीही तिचे कौतुक केले होते. अभ्यासातही तिची चांगली प्रगती आहे.
३ आ २. देवाची ओढ : तिला लहानपणापासून देवाची ओढ आहे. मी देवपूजा करतांना ती नेहमी माझ्या शेजारी येऊन बसायची.
३ इ. वय – ७ ते १४ वर्षे
३ इ १. नम्र : ती सर्वांशी हळू आवाजात आणि नम्रपणे बोलते. ती शेजारी, तसेच वडीलधार्या व्यक्ती यांच्याशी नम्रतेने वागते. तिला सांगितलेली कुठलीही गोष्ट ती लगेच ऐकते.
३ इ २. शांत आणि समाधानी : ती शाळेत सर्वांशी मिळून मिसळून वागते. ‘ती शांत स्वभावाची आहे’, असे तिच्या शाळेतील शिक्षक सांगतात. तिने कधीही कपडे किंवा खाऊ यांसाठी हट्ट केला नाही. जे आहे, त्यातच ती समाधानी असते.
३ इ ३. विविध कला शिकणे : तिला नृत्याची आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची आवड आहे. तिने कराटेचे थोडे शिक्षण घेतले आहे. तिला गायनाचीही आवड आहे. ती जेवणातील काही पदार्थ उत्तम करते. हे सर्व ती अभ्यास करून करते.
३ इ ४. प्रेमभाव : तिला प्राण्यांना खायला द्यायला आणि त्यांच्याशी खेळायला फार आवडते.
३ इ ५. साधनेची आवड : ती नियमित सत्संग ऐकते, नामजप, प्रार्थना करते आणि कृतज्ञता व्यक्त करते. ती प्रतिदिन सायंकाळी रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि नित्य पाठाच्या ४२ ओव्या म्हणते. तिला सात्त्विक कपडे आणि रंग आवडतात.
ती मला आणि तिच्या बहिणींना कामांत साहाय्य करते. ती प्रामाणिक आहे. ती कधी कुठल्याही गोष्टीचा ताण घेत नाही. प्रत्येक कृती आनंदाने करते.’
– सौ. विनीता परब (कु. स्वामिनीची आई), शिरवळ, सातारा .(२०.११.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |