परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका
‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० मे २०२१ पासून दैनिकातील अनेक चुका लक्षात आणून देण्यास प्रारंभ केला. शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील अशा लहान लहान चुकांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी झाली.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/511155.html
साधनेसाठी हानीकारक ठरलेल्या चुकांचे स्वरूप साधकांना लक्षात यावे, सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या लिखाणाच्या सेवेत होणार्या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके (१३.८.२०२१)
स्वतःकडून चूक झाल्याचे कळल्यावर वाईट वाटले, तरच त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न होतो !‘साधना करतांना झालेल्या चुकांकडे बघण्याचा दृष्टीकोन केवळ ‘त्या शिकण्यासाठी आहेत’, असा वरवरचा राहिला, तर त्यातून अपेक्षित पालट होण्याची गती अतिशय अल्प रहाते. चूक झाल्याचे कळल्यावर प्रथम ‘माझ्याकडून ही चूक झाली’, याची खंत वाटली पाहिजे आणि वाईट वाटले पाहिजे. ही प्रक्रिया झाली, तरच त्या चुकीतून शिकणे होऊन जलद आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |