जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपात छिंदम बंधूंना अटक !
नगर, १६ सप्टेंबर – काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्यांचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांनी १५ सष्टेंबर या दिवशी अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध चालू आहे. त्यांच्याविरुद्ध २ मासांपूर्वी एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. ही टपरी जेसीबीने उखडून टाकून ती जागा बळकावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. गुन्हा घडल्यापासून भूमी मिळवण्याच्या प्रयत्नात ते पसार होते. त्यांच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. देहलीगेट येथील ज्युसचे दुकान चालवणारे भागीरथ बोडखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छिंदम बंधू आणि इतर ३० ते ४० अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.