परिवहनमंत्री अनिल परब भाजपचे सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुहानीचा दावा करणार !
मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अनिल परब यांनी सोमय्या यांना ‘केलेल्या आरोपांविषयी तीन दिवसांत विनाअट क्षमा मागावी, तसेच मानहानीकारक आणि बिनबुडाचे आरोप करणे न थांबवल्यास १०० कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करणार’, अशी नोटीस पाठवली आहे.
सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोली येथे बेकायदा उपाहारगृह बांधणे, परिवहन विभागात स्थानांतराचे ‘रॅकेट’ चालवणे असे गंभीर आरोप केले होते. सोमय्या हे वर्ष २०२१ पासून प्रसारमाध्यमांमधून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी नोटीस पाठवली आहे.