देहली येथे पंतप्रधानांच्या हस्ते संरक्षण खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन
नवी देहली – केंद्रशासनाच्या ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा’च्या अंतर्गत येथे संरक्षण खात्याच्या कार्यालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यासह पंतप्रधानांनी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा’च्या नवीन संकेतस्थळाचेही उद्घाटन केले. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्यदलप्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे उपस्थित होते. ‘या कार्यालयातून भारतीय सैन्याचे कामकाज प्रभावीपणे होईल’, असेही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.
सौजन्य : यू ट्यूब