(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका दौर्यावर रात्रीची झोप लागू देणार नाही !’ – खलिस्तानी संघटनेची धमकी
शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकर्यांविरुद्ध झालेल्या कथित हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्याची धमकी
खलिस्तानी आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार आता तरी कठोर पावले उचलणार का ? – संपादक
न्यूयॉर्क – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्यावर आल्यावर त्यांना रात्रीची झोप लागू देणार नाही, अशी धमकी ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी संघटनेच्या आतंकवाद्यांनी दिली.‘क्वाड’ (भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान) देशांच्या परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत. ‘इंडिया टुडे’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’ भेटीच्या वेळी तेथे निदर्शेने करण्याचा घाट ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेने घातला आहे. भारतात शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकर्यांविरुद्ध झालेल्या कथित हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले जाईल, असेही या संघटनेकडून सांगण्यात आले. भारताने १० जुलै २०१९ या दिवशी ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेवर कारवाई करत तिच्यावर बंदी घातली होती.