हिंदु राष्ट्राचे वैशिष्ट्य
‘व्यष्टी आणि समष्टी यांच्यात सुरेख समतोल साधावा, ही या भारताची शिकवण आहे. समाजाने एकेका व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्याची ग्वाही द्यावी, तर व्यक्तीमात्राने ‘अशा स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर होणार नाही’, ‘स्वतःच्या स्वच्छंदी आणि बेछूट वर्तनामुळे समाजस्वास्थाची व्यवस्था बिघडणार नाही’, ही दक्षता घ्यावी, असे अनोखे संतुलन हे हिंदु राष्ट्राचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. भोगाऐवजी त्यागाला, संघर्षाऐवजी समन्वयाला, व्यावर्तनाऐवजी (वेगळेपणाऐवजी) समावेशाला प्राधान्य दिले जाते, हीसुद्धा भारताची विशेषताच आहे.
– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक, नोव्हेंबर – डिसेंबर २०११)