‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ असणार्या आणि प्रतिकूल शारीरिक स्थितीतही तळमळीने सेवा करणार्या सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रूपावती न्यामणे (वय ६६ वर्षे) !
१. जवळीक साधणे
‘न्यामणेकाकूंनी सत्संगातील साधकांशी चांगली जवळीक साधली आहे.
२. ‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ
काकूंना ‘सत्संगातील साधकांची साधना व्हावी’, असे वाटत असते. त्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. साधक सेवेत रहाण्यासाठी त्या नियमितपणे साधकांना संपर्क करतात. त्या साधकांची व्यष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करतात.
३. सेवेची तळमळ
काकूंची शारीरिक स्थिती नाजूक आहे, तरीही त्या सत्संग घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी सेवा करणे, अशा सेवा करतात. त्या ग्रंथप्रदर्शनाच्या वेळी येणार्या जिज्ञासूंशी जवळीक साधतात.’ – सौ. लतिका पैलवान, सोलापूर
४. भाव
४ अ. सुनेची आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : ‘काकूंना २ सुना आहेत. काकू त्यांनाही साधना आणि सेवा करण्याविषयी सांगतात. काकू सुनांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देतात. काकूंची सून सौ. सुनीता न्यामणे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित केल्यावर काकूंना पुष्कळ आनंद झाला. काकूंना सुनेविषयी कृतज्ञता वाटून त्यांची भावजागृती झाली.
४ आ. गुरुदेवांप्रती भाव : ‘गुरुदेवांमुळेच मला चांगली सून मिळाली. तिने माझ्या कुळाचा उद्धार केला. मला तिचा सत्संग मिळतो. मला प्रतिदिन तिच्या हातून महाप्रसाद मिळतो. गुरुदेवांची माझ्यावर कृपा आहे’, असा काकूंचा भाव असतो.’
– कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर (२२.१०.२०१९)