चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी स्नेहाताईला शुभाशीर्वाद ।
कुलदेवाची कृपा अन् माता-पित्याची पुण्याई ।
झरकर-हाके सोयर जुळले ।
परात्पर गुरुदेवांचे (टीप १) आशीर्वाद लाभले ।। १ ।।
चि. सौ. कां. स्नेहाताई ।
सर्वांचे शुभाशीर्वाद तुजला ।
पहाट झाली सूर्य उगवला ।
आश्रमातील मंदिरामध्ये वाजतो चौघडा ।। २ ।।
चिरंजीव सचिन आणि चि.सौ.कां. स्नेहा ।
यांचा आहे विवाहसोहळा ।
परात्पर गुरुदेवांच्या आशीर्वादाने ।
तू कुमारिकेची सौभाग्य कांक्षिणी झालीस ।। ३ ।।
पायी पैंजण अन् गळा मंगळसूत्र ।
भाळी शोभे लेणे सौभाग्याचे ।
हे रूप पाहूनी हसली कुलदेवता ।। ४ ।।
हळदीचे तव पाऊल पडता ।
डोळ्यांत येती गंगा-यमुना ।
सासरी सगळे जीव लावतील तुजला ।
आशीर्वाद हा जोशीआजोबांचा ।। ५ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. सुधाकर जोशी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, तालुका पनवेल. (२.९.२०२१)