सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांध रुग्णाकडून ७० वर्षीय रुग्णाची सलाईनचा रॉड डोक्यात घालून हत्या !
धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक
सोलापूर – येथील शासकीय रुग्णालयात ‘ये सैतान है, मुझे तकलीफ दे रहा है…’ असे ओरडत युसूफ मौलाली पिरजादे या रुग्णाने ७० वर्षीय बेघर रुग्णाला सलाईनच्या रॉडने मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याविषयी आधुनिक वैद्य (डॉ.) सौरभ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकमध्ये तिसर्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागामध्ये बेघर असलेल्या ७० वर्षीय रुग्णावर जानेवारी २०२१ पासून उपचार चालू होते. त्याच विभागात युसूफ मौलाली पिरजादे याला फुप्फुसाच्या विकारावर उपचार करण्यासाठी ११ सप्टेंबर या दिवशी भरती करण्यात आले होते. १३ सप्टेंबर या दिवशी युसूफ मौलाली पिरजादे हा वृद्ध रुग्णाकडे हात करून ‘ये सैतान है, मुझे तकलीफ दे रहा है…’, असे ओरडू लागला. त्यानंतर त्याने सलाईनचा रॉड वृद्धाच्या डोक्यात घातला. यामध्ये वृद्ध गंभीर घायाळ झाल्याने त्यांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.