(म्हणे) ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू करण्यात आलेला ज्योतिषशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम रहित करा !’
चांदूर (अमरावती) येथे अंनिसचे निवेदन
सहस्रो वर्षांपूर्वीची सनातन धर्माची शास्त्रपरंपरा नास्तिकतावाद्यांना कधी तरी कळू शकेल का ? त्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागतो ! – संपादक
अमरावती – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने चालू केलेला ज्योतिषशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम रहित करावा, अशा आशयाचे निवेदन अंनिसच्या वतीने चांदूर येथील तहसीलदारांना देण्यात आले आहे.
‘ज्योतिष हे शास्त्र नसून पोट भरण्याचा धंदा आहे. जगातील १८६ शास्त्रज्ञ ज्योतिषाला मान्यता देत नाहीत. लोकांनी ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवू नये. युवकांनी महाराष्ट्रातील पुरोगाम्यांची परंपरा चालू ठेवावी. ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम चालू करणे म्हणजे समाजाला अंधःकारात ढकलण्यासारखे आहे’, अशी द्वेषपूर्ण विधाने या निवेदनात करण्यात आली आहेत.