वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्या विविध माध्यमांतून लपवण्याचा प्रयत्न करणार्यांना ५ सहस्र रुपयांचा दंड होणार !
नवी देहली – बरेच वाहनचालक त्यांची दुचाकी, चारचाकी आदी वाहनांना लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधतात. काही जण गाडीच्या क्रमांकाच्या पाटीवरच ते बांधतात. असे करणार्या काही जणांचा ‘क्रमांकाची पाटी दिसू नये’, असा उद्देश असतो. त्यामुळे आता नव्या वाहतूक नियमांनुसार असा प्रकार कुणी करत असेल किंवा दुसर्या कोणत्याही मार्गाने क्रमांकाची पट्टी झाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर वाहनचालकाकडून ५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. असा नियम अद्याप महाराष्ट्रात लागू झालेला नसला, तरी देहलीमध्ये वाहतूक पोलिसांनी तो लागू केला आहे.
देहली पोलिसांनी लोकांना ‘अशा गाड्या दिसल्या की, त्यांची छायाचित्रे काढून पोलिसांच्या ट्विटर, फेसबूक आदी सामाजिक माध्यमांच्या खात्यांवर पोस्ट करा’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.