गणेशोत्सवात वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याचे पोलिसांपुढे आव्हान !
पुणे – गणेशोत्सवामध्ये भाविकांची मध्यभागातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे आणि मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी वाढत आहे; मात्र कोरोनाच्या संसर्ग काळात वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. गौरी विसर्जनानंतर होणार्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मध्यभागातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे.