पोलीस निरीक्षकांनी पत्रकारांना केली धक्काबुक्की !
मुंबई – मुंबईतील लालबागचा राजा मंडळात पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सामान्यांना गणरायाचे दर्शन घेण्याची अनुमती नाही. लालबागचा राजा या मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहेत; परंतु पास दाखवूनही पोलिसांनी पत्रकारांसमवेत अरेरावी करत धक्काबुक्की केली.