किरीट सोमय्या यांच्याकडून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात २ सहस्र ७०० पानांचे पुरावे सादर !
मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (‘ईडी’कडे) १४ सप्टेंबर या दिवशी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात २ सहस्र ७०० पानांचे पुरावे सादर केले. सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय यांनी विविध मार्गांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. ‘याविषयी मी लवकरच ‘ईडी’कडे पुरावे सादर करीन’, असे त्यांनी सांगितले होते.