अंबरनाथमध्ये अपघातात ४ जण ठार !
ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – १२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली. या अपघातात उल्हासनगर येथील एकाच कुटुंबातील तिघे आणि रिक्शाचालक अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.