नवरात्रीमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत असणार्या ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक !
|
या आतंकवाद्यांना आता आजन्म पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक
नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने उत्तरप्रदेश, देहली आणि महाराष्ट्र येथून ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. यात दोघा पाकिस्तानी आतंकवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांकडून मिळणार्या आदेशानुसार ते नवरात्र आणि अन्य सणांच्या वेळी घातपात करणार होते. तसेच उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभेच्या निवडणुकीतही घातपात करण्याचा त्यांचा डाव होता.