खारेपाटण येथे दीड लाख रुपयांचा गुटखा पोलिसांच्या कह्यात

प्रतीकात्मक छायाचित्र

कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्यावर १३ सप्टेंबरला पोलिसांनी एका टेंपोची तपासणी केली. या वेळी पोलिसांना टेंपोत दीड लाख रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी गुटखा आणि वाहन कह्यात घेतले. या प्रकरणी संशयित आरोपी प्रकाश निरंकारी (गांधीनगर, कोल्हापूर) याला अटक केली आहे. (गुटख्यावर बंदी असतांनाही त्याचे उत्पादन आणि वाहतूक होते कशी ? कि संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी व्यावसायिकांचे लागेबंधे आहेत, असे समजायचे ? प्रशासनाने गुटख्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यात वेळ अन् जनतेचा पैसा वाया घालवण्यापेक्षा गुटख्याची निर्मितीच रोखावी ! – संपादक)