साडेतीन अक्षरांचे महत्त्व
‘मुहूर्त साडेतीन असले, वाद्ये साडेतीन असली, पीठे साडेतीन असली, शहाणे साडेतीन असले, तरी अर्धा आकडा हा कमीपणाचा समजू नये; कारण भारतीय संस्कृतीत ‘ओंकार’ म्हणजे ‘प्रणव’ होय. अ + उ + म् + ॅ मिळून बनतो. म्हटले, तर हे ४ विभाग होत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या यांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्या तिन्ही देवता समाविष्ट आहेत. त्यात न्यून (कमी) कोण आणि अधिक कोण ? हे ज्याचे त्याने ठरवावे हे उचित होय.’
– डॉ. अशोक मोडक (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’ दीपावली विशेषांक नोव्हेंबर – डिसेंबर २०११)