भ्रमणभाषवरील खेळावरून भावासमवेतच्या वादानंतर बहिणीची आत्महत्या !
भ्रमणभाषवरील खेळांचे व्यसन लागल्यामुळे होणारे अनेक दुष्परिणाम समोर येत असल्याने आतातरी पालकांनी मुलांना भ्रमणभाषचा दुरुपयोग करू देण्यास टाळणे आणि प्रशासनाने या खेळांवर निर्बंध आणणे आवश्यक बनले आहे.– संपादक
मुंबई – भ्रमणभाषवरील खेळ खेळण्यावरून भावासमवेत वाद झाल्याने १६ वर्षांच्या बहिणीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. १० सप्टेंबरच्या रात्री या दोघांमध्ये भ्रमणभाषवरील खेळ खेळण्यावरून मोठा वाद झाला होता. कुटुंबाकडे एकच भ्रमणभाष होता. भावाने भ्रमणभाष न दिल्याने राग अनावर होऊन बहिणीने उंदीर मारण्याचे औषध प्यायले. हे समजताच तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले; परंतु १२ सप्टेंबरला सकाळी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.