घरातील ढोबळी मिरचीचा गणपतीसारखा आकार पाहून गणपति आल्यासारखेच वाटणे आणि ‘देव सतत पाठीशी आहे’, याची जाणीव होणे
‘११.५.२०२० या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता मी स्वयंपाक करण्यासाठी ढोबळी (भोपळी) मिरची चिरू लागले. त्या मिरचीचा आकार गणपतीसारखा होता. हे पाहून मी आश्चर्यचकीत झाले. तेव्हा मला घरात गणपति आल्यासारखेच वाटले. त्यामुळे घरातील सर्वांना बोलावून मी ती मिरची दाखवली. घरातील सर्व जण म्हणाले, ‘‘हो, खरंच हा गणपतिच आहे.’’ नंतर आम्ही तो गणपति देवघरात नेऊन ठेवला आणि त्याची पूजा केली. या दिवशी आमच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस होता. गणपतीने आम्हाला दर्शन आणि आशीर्वाद दिले. त्याविषयी आमची पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देव सतत पाठीशी आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर, ठाणे (२७.५.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |