हिंदू भारतातील इतर धर्मियांना विरोध करत नाहीत, तर तालिबानी जगभर इतर धर्मियांवर दबाव निर्माण करतात !
‘पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे. संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेल्या ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांचाही यांत समावेश आहे. या २ आतंकवादी संघटनांनी पूर्वीही अफगाणिस्तानात कारवाया केल्या आहेत, आताही त्यांचे तेथे लक्ष असेलच. पाकिस्तानकडे त्या दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पाकवर टीका केली आहे.’