पाकमध्ये धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर ३ मास सामूहिक बलात्कार आणि नंतर बलपूर्वक धर्मांतर !
पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ? – संपादक
नवी देहली – पाकच्या सिंध प्रांतामध्ये सशस्त्र धर्मांधांनी एका हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सतत ३ मास सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला मुसलमान बनवण्यात आले. यानंतर ती त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यास यशस्वी झाली; मात्र अद्याप प्रशासनाने तिला तिच्या पालकांकडे सोपवलेले नाही. मुलगी परत मिळावी म्हणून तिचे पालक प्रयत्न करत आहेत; मात्र पाकच्या कायद्यांमुळे ते सहज शक्य नाही, अशी माहिती दक्षिण कोरियातील पाकिस्तानी वंशाचे मानावधिकार कार्यकर्ते अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली आहे. (विदेशातील मानवाधिकार कार्यकर्त्याला माहिती मिळते; मात्र भारतात हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये का प्रसारित झाले नाही ? वास्तविक केवळ पाकच नव्हे, तर जगभरात कुठल्याही हिंदूवर अत्याचार झाला, तर त्याची माहिती भारत सरकारने विविध माध्यमांद्वारे हिंदूंना द्यायला हवी आणि संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी काय करणार, हेही सांगायला हवे ! – संपादक)
A Hindu girl Tamana Meghwad was abducted by armed men from Kunri sindh-Pakistan. She was constantly gang raped for 3 months & forcefully converted to Islam. She managed to escape but now the girl & the family running for lives because system of Pakistan doesn’t allow such return. pic.twitter.com/iPz2QIqhOH
— Rahat Austin (@johnaustin47) September 14, 2021