नंजनगुडू (कर्नाटक) येथे प्राचीन मंदिर पाडल्यावरून काँग्रेसची भाजप सरकारवर टीका
मैसुरू (कर्नाटक) – मैसुरू जिल्ह्यात असलेल्या नंजनगुडू येथे एक प्राचीन हिंदु मंदिर रस्त्याच्या मधे येत असल्याने ते पाडण्यात आले आहे. यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंदिर पाडण्याच्या घटनेची निंदा केली आहे. ‘भाजप सरकारने मंदिर पाडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांचा सल्ला घ्यायला हवा होता’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मंदिर पाडल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. प्रशासनाने प्रक्रियेचे पालन केलेले नाही. हे मंदिर उभारण्यासाठी सरकारने हिंदूंना भूमी द्यावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (मुख्यमंत्री असतांना हिंदूंना पूज्य असणार्या गायीच्या हत्येचे समर्थन करणारे आणि गोमांस भक्षणाचा पुरस्कार करणारे सिद्धरामय्या यांना अचानक हिंदूंचा पुळका कसा काय आला ? – संपादक)