७८ वर्षांच्या श्रीमती शैलजा लोथे यांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात व्यायाम प्रकार करतांना ‘देव बघत आहे’, असा भाव ठेवल्याने त्यांचे पाय दुखायचे थांबणे
‘नागपूर येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू झाल्यापासून मी नियमितपणे प्रशिक्षणवर्गाला जात होते. आधी माझे पाय पुष्कळ दुखायचे आणि माझ्या पायांत गोळे यायचे. माझ्या पायातील शिरेवर शीर चढल्याने मला भयंकर त्रास व्हायचा. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात व्यायामाचे प्रकार केल्याने माझे पाय दुखायचे थांबले आणि माझ्या पायांत गोळे येणेही बंद झाले. ‘व्यायाम प्रकार करतांना देव माझ्याकडे बघत आहे’, असा माझा भाव असतो. ’ – श्रीमती शैलजा लोथे, नागपूर (२७.१०.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |