‘स्वार्थी’पणाच्या संदर्भात व्यष्टी साधनेतील धोका आणि समष्टी साधनेचा लाभ !
‘व्यष्टी साधना करणार्या साधकाची साधना ‘माझी साधना कशी होईल ? माझी साधना होण्यासाठी मी अजून काय करू ?’, या प्रमुख विचारांच्या आधारे चालू असते. यामध्ये केवळ स्वतःच्याच साधनेचा विचार प्राधान्याने केला जातो. या विचारानुसार साधना करणार्या काही साधकांच्या विचारांचे रूपांतर पुढे स्वतःच्याच विचारांत गुरफटून ‘स्वार्थीपणा’मध्ये होण्याची शक्यता अधिक असते. याउलट समष्टी साधना करणार्या साधकाची साधना ‘इतरांची साधना कशी होईल ? इतरांना साधनेत साहाय्य कसे करू ?’ या विचारांच्या आधारे चालू असते. त्यामुळे यात त्याचे ‘मी’पण नष्ट होते; परिणामी ‘स्वार्थी’पणाही आपोआप नष्ट होतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले