६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !
भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी (१४.९.२०२१) या दिवशी कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी याचा ९ वा वाढदिवस आहे. मुलांवर लहान वयापासून साधनेचे संस्कार केल्यामुळे ‘मुले कशी घडतात ?’, याचे नंदन हे एक उदाहरण आहे. ‘नंदनवर त्याच्या आईने साधनेचे कसे संस्कार केले ? भावप्रयोग घेतल्यामुळे त्याच्या मनात देवाविषयी भावविश्व कसे निर्माण झाले ?’, ते सर्व पाहून सर्वांना ‘मुलांवर बालवयातच साधनेचे संस्कार कसे करायचे ?’, हे शिकायला मिळेल.
(‘वर्ष २०१५ मध्ये कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)
कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. वय २ ते ४ वर्षे
१ अ. नंदन २ वर्षांचा असल्यापासून त्याच्याकडून करवून घेतलेली व्यष्टी साधना
१ अ १. नामजप : ‘मी त्याच्याकडून प्रतिदिन बसून अर्धा घंटा नामजप करवून घेत होते.
१ अ २. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी करवून घेतलेले प्रयत्न
अ. मी नंदनमधील स्वभावदोष आणि अहं यांचा अभ्यास करून त्याला त्याच्या चुका विचारत होते आणि सांगत होते. त्यानंतर त्याच्याकडून क्षमायाचना करवून घेऊन स्वयंसूचनेचे सत्र करवून घेत होते.
आ. त्याच्याकडून दिवसभरात ५ वेळा प्रार्थना आणि ५ वेळा कृतज्ञता व्यक्त करवून घेत होते.
इ. त्याचा देवाप्रती भाव वाढावा; म्हणून प्रतिदिन भाववृद्धी होण्यासाठी एक छोटासा भावप्रयोग करवून घेते.
१ आ. नंदनने आईला ‘न रागावता प्रेमाने चुका सांग’, असे सांगणे : मला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे नंदनकडून चुका झाल्यावर मी त्याला पुष्कळ रागवायचे. अशा वेळी तो मला त्याची जाणीव करून द्यायचा आणि म्हणायचा, ‘‘प्रेमाने सांग ना गं आई ! मी तुझे ऐकीन. तू मला रागावू नकोस. तुझे असे वागणे श्रीकृष्णाला आवडेल का ?’’ तो मला असे दिवसातून २० – २५ वेळा तरी सांगायचा. अशा प्रकारे जणू तो माझ्याकडून सूचनासत्रच करवून घ्यायचा. त्यामुळे आता त्याच्याकडून काही चूक झाली, तर मी त्याला प्रेमाने सांगायला आरंभ केला आहे.
१ इ. आईचे डोके दुखत असतांना नंदनने आईच्या डोक्यावर हात ठेवून श्री गणेशाचा नामजप करणे आणि ‘श्रीकृष्णाने असे करायला सांगितले’, असे सांगणे : एक दिवस माझे डोके फार दुखत होते आणि मला पुष्कळ थकवा जाणवत होता. त्यामुळे मी खोलीत जाऊन झोपले. त्या वेळी नंदन केवळ साडेतीन वर्षांचा होता. नंदनने मला विचारले, ‘‘आई, तुला त्रास होत आहे का ?’’ मी त्याला ‘‘हो’’ म्हणाले. तेव्हा त्याने त्याचा हात माझ्या डोक्यावर ठेवून अर्धा घंटा ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप केला. त्यामुळे मला आराम वाटून चांगले वाटायला लागले. मला बरे वाटल्यावर मी त्याला विचारले, ‘‘तुला श्री गणेशाचा नामजप करायला कुणी सांगितले ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘श्रीकृष्णाने !’’
१ ई. नंदनची साधना चांगली होण्यासाठी संतांनी केलेले अनमोल साहाय्य !
१ ई १. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचे नंदनवर पुष्कळ प्रेम आहे. त्यांच्या बोलण्यातील माधुर्याने नंदन त्यांच्याकडे आकर्षित होतो. त्यांच्यामुळे नंदनला नामजपाची गोडी लागली. त्यांनी त्याच्यामध्ये श्लोक म्हणण्याविषयी रुची निर्माण केली. त्यांनीच नंदनला ‘चैतन्य, आनंद, साधना, ईश्वराप्रती अनुसंधान’ या सर्व शब्दांचे अर्थ सांगून त्याला देवाशी जोडले.
१ ई २. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : नंदन अडीच वर्षांचा असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्रमातील बालसाधकांकडून झालेल्या चुकांची त्यांना जाणीव करून दिली. तेव्हा नंदनकडूनही भरपूर चुका झाल्या होत्या. नंतर मी नंदनला विचारले, ‘‘तुला काय वाटले ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना आम्हाला पुन्हा अशी जाणीव करू द्यावी लागणार नाही, असे मी प्रयत्न करीन.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंची तत्त्वनिष्ठता आणि वेळोवेळी चुका सांगण्यामुळे नंदनवर जे अयोग्य संस्कार होणार होते, ते टाळायला आणि देवाला अपेक्षित असे नंदनला घडवायला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी मला साहाय्य केले.
१ ई ३. पू. संदीप आळशी : पू. संदीपदादांनी प्रत्येक वेळी नंदनला ‘कधी आणि कुठली प्रार्थना करायची ?’, ते सांगितले. पू. संदीपदादांची तळमळ आणि संकल्प यांमुळेच केवळ नंदनमध्ये नामजप करण्याची आवड निर्माण झाली आहे. ते नंदनसाठी प्रसाद पाठवून त्याला नामजप करायला प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे मला नंदनमध्ये साधनेचे बीज रोवायला सोपे गेले. नंदनवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत असत, तेव्हा पू. संदीपदादा मला ‘त्याच्यासाठी नामजपादी उपाय कोणते करायचे ?’, हे सांगायचे.
‘नंदनची साधना चांगली व्हावी आणि त्याचे व्यक्तीमत्त्व चांगले घडावे’, यासाठी या सर्वांनी केलेल्या साहाय्यासाठी मी त्यांची अत्यंत ऋणी आहे.
१ उ. परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती नंदनच्या मनात असलेला अनन्य भाव !
१. भावप्रयोग करतांना परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सूक्ष्मातून भेटण्याच्या संदर्भातील प्रयोग त्याला आवडतात. त्याला सूक्ष्मातून परम पूज्यांच्या खोलीत जायला फार आवडते. रात्री झोपतांना तो ‘परम पूज्यांच्या मिठीत झोपूया’, असे म्हणतो.
२. ‘श्रीकृष्ण, म्हणजेच परम पूज्य आहेत आणि परम पूज्य, म्हणजेच श्रीकृष्ण आहे. हे दोघेही श्रीविष्णु आहेत’, याची त्याला १०० टक्के निश्चिती आहे. तसे तो दिवसातून २ – ३ वेळा तरी असे सांगतो.
३. तो नामजपाला बसल्यावर ‘श्रीकृष्ण त्याच्या बाजूला बसला आहे’, असा भाव ठेवतो.
४. मला साधनेत काही अडचण आली, तर तो मला सांगतो, ‘‘आई, श्रीकृष्णाला प्रार्थना कर. तो तुला साहाय्य करील.’’ यावरून त्याची ‘श्रीकृष्णावर अपार श्रद्धा आहे’, असे मला जाणवते.
१ ऊ. नंदनमध्ये जाणवलेले पालट !
१. पूर्वी तो बालसाधकांशी खेळत असतांना मी त्याला बोलावले, तर तो लगेच येत नसे; पण आता मी बोलावल्यावर तो लगेच येतो.
२. पूर्वी त्याला नामजप करायला आवडत नसे; पण आता तो आनंदाने स्वतःहून नामजपाला बसतो.
३. पूर्वी नंदन श्रीकृष्णाशी बोलत नसे; पण आता तो प्रत्येक कृती करतांना श्रीकृष्णाला प्रार्थना करून आणि त्याला विचारून करतो.’
– सौ. सौम्या कुदरवळ्ळी, (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०१६) क्रमशः
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |