(म्हणे) ‘भारत इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना त्याच्या देशात प्रशिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचा बिनबुडाचा आरोप
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत सरकारकडून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी गुलमर्ग, रायपूर, जोधपूर, चकराता, अनूपगड आणि बिकानेर येथे प्रशिक्षण केंद्रे बनवण्यात आली आहेत. या केंद्रांचा उद्देश काश्मीरमधील स्वतंत्रता आंदोलनाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरमधील आंदोलनाचा संबंध आंतरराष्ट्रीय आतंकवादाशी जोडण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या सदंर्भात संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांना कागदपत्रे सादर करण्यात येतील, अशी माहिती पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दिली आहे. शाह महमूद कुरैशी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसूफ आणि मानवाधिकार प्रकरणांचे मंत्री शिरीन मंजारी यांनी पत्रकार परिषदेत भारतावर हा आरोप केला.