‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’मुळे अमेरिकेत हिंदूंवर वांशिक आक्रमणे वाढण्याचा धोका ! – अमेरिकेतील हिंदूंची भीती
आतातरी केंद्र सरकार यात लक्ष घालून जगभरातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलणार का ?
नवी देहली – अमेरिकेतील साम्यवाद्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे समूळ उच्चाटन) या परिषदेद्वारे हिंदूंच्या विरोधात द्वेष पसरवण्यात आल्यामुळे अमेरिकेतील हिंदूंवरील वांशिक आक्रमणे वाढतील, अशी भीती तेथे रहाणार्या हिंदूंना वाटत आहे, असे समोर आले आहे.
१. पत्रकार अशोक श्रीवास्तव म्हणाले की, हिंदुत्व उखडून फेकण्यासाठी जागतिक स्तरावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात अनेक महाविद्यालयांचा समावेश होता. जे हिंदूंचा द्वेष करतात, त्यांचे षड्यंत्र आहे.
२. या परिषदेच्या विरोधात अमेरिकेतील काही ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. निदर्शने करणार्या हिंदूंचे म्हणणे आहे की, अनेक भारतीय आणि हिंदु विद्यार्थी या परिषदेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. अशातच हिंदूविषयी परिषदेतून द्वेष पसरवण्यात आल्याने त्याचे वाईट परिणाम समोर येऊ शकतात. तसेच अशा परिषदा आता अमेरिकेप्रमाणे अन्य देशांतही आयोजित केल्या जाऊ शकतात.
३. अमेरिकेतील प्रसिद्ध खासदार नीरज अँथनी म्हणाले की, ही परिषद म्हणजे हिंदुविरोधी लोकांचा जमाव आहे. याविरोधात लोकांनी संघटित झाले पाहिजे. अशा परिषदांमुळे अमेरिकेतील हिंदूंवर आक्रमण होण्यास प्रोत्साहन मिळेल.
४. काही महाविद्यालयांनी स्पष्ट केले की, आम्ही या परिषदेचा भाग नाही; मात्र आमचे काही शिक्षक यात सहभागी झालेले असू शकतात.
(म्हणे) ‘हिंदुत्वाला नष्ट करायचे आहे !’ – आकांक्षा मेहता
हिंदुत्वाला नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे इतिहासात अपयशी म्हणून गणले जातील. हिंदुत्वाला नष्ट करणे मोगल आणि इंग्रज यांनाही जमले नाही, ते आता काही फुटकळ आणि मूठभर करून दाखवण्याच्या बाता मारत आहेत, हे हास्यास्पदच होय ! – संपादक
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या आकांक्षा मेहता यांनी परिषदेत म्हटले की, आमचे लक्ष्य हिंदुत्वाला नष्ट करणे, हे आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदु धर्म नाही. हिंदुत्व एक धोकादायक गोष्ट आहे आणि भविष्यात ते आम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जेथे आम्हाला जायचे नाही.