सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !
१. सेवा करतांना शरणागती निर्माण होण्यासाठी प्रसंग घडतात.
२. सेवा सहजतेने होत गेल्यास आपण कसे घडणार ?
३. आपल्याला सतत देवाचा आधार घेण्याची सवय लागली पाहिजे.
४. कोणतेही नियोजन करतांना संभाव्य अडचणी लक्षात घेऊन पर्यायी साधकांचे नाव सुचवून कागदावर लिखित स्वरूपात नियोजन करावे.
५. ‘साधकांची उणीव भासते, सेवेसाठी साधक मिळत नाही’, याचा ताण घेण्यापेक्षा ‘त्या सेवेसाठी देवाच्या नियोजनात कोण असेल ?’, याचा शोध घेतला पाहिजे.’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१२.२०१९)