सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यासंदर्भातील दैवी पैलू उलगडून दाखवणार्या कु. श्रद्धा लोंढे !
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे राहून पूर्णवेळ साधना करणारी कु. श्रद्धा लोंढे हिचा ‘साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि ‘विनम्रता, व्यापकता, प्रीती अन् गुरुदेवांप्रती भाव’ आदी गुणांचा संगम असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !’ हा लेख ११ सप्टेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात पृष्ठ ६ वर प्रसिद्ध झाला आहे. या लेखाच्या माध्यमातून कु. श्रद्धा हिने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यासंदर्भातील अनेक दैवी पैलू अत्यंत चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितले आहेत. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात महिनोंमहिने किंवा वर्षानुवर्षे रहाणार्या साधकांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याबद्दल लिहिता येत नाही, ते देवद आश्रमात केवळ १५ दिवस रहाणार्या कु. श्रद्धा लोंढे हिने लिहिले आहे. याबद्दल तिचे कौतुक करावे, तेवढे थोडे !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले