परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांना ज्या चुका अनेक वेळा वाचूनही लक्षात आलेल्या नसतात, त्या चुका एकाच वाचनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात येतात. ते त्या सर्व चुका ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवतात. ‘चुकांचे प्रमाण अल्प होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून कशा प्रकारे प्रयत्न करवून घेतले ?’, तो भाग २२ आणि २९ ऑगस्ट या दिवशी आपण पाहिला. चुका कशा प्रकारच्या असतात, हे कळण्यासाठी सदर प्रसिद्ध करत आहोत. साधकांनी सेवा करतांना योग्य ती काळजी घेऊन परिपूर्ण सेवा करावी.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० मे २०२१ पासून दैनिकातील अनेक चुका लक्षात आणून देण्यास प्रारंभ केला. शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील अशा लहान लहान चुकांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी झाली. साधनेसाठी हानीकारक ठरलेल्या चुकांचे स्वरूप साधकांना लक्षात यावे, सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510351.html
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या लहान चुकांचा अभ्यास करण्याचे कारण‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘बातम्या चुकीच्या छापल्या’, यासारख्या गंभीर चुका होत नाहीत, तर व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या थोड्या चुका आहेत. या टप्प्याच्या चुकांमुळे वाचकांची काही हानी होत नाही; परंतु यामुळे गेल्या १० – १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांची प्रगती लवकर होत नाही. त्यांच्या जीवनातील साधनेचा काळ या चुकांमुळे वाया जाऊ नये, यासाठी मी या चुकांचा अभ्यास करत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक-संपादक, सनातन प्रभात |