हसतमुख, तसेच सेवेचा ध्यास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !
१. हसतमुख
‘वर्ष १९९९ मध्ये संभाजीनगर येथे माझा श्री. शिरीष देशमुखकाका यांच्याशी संपर्क झाला. ते नेहमी हसतमुख असतात. ते प्रत्येक वयोगटातील व्यक्तीशी खेळीमेळीने वागतात.
२. कर्तेपणा नसणे
देशमुखकाकांना समाजात पुष्कळ मान होता. ते ‘एम्.एस्.ई.बी’ मध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्यांना पत्रकारितेची आवड होती. त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. त्यांचा सामाजिक परिवारही पुष्कळ मोठा होता; परंतु काकांना या गोष्टींचा अहंकार नाही. ते यांचा कधी उल्लेखही करत नाहीत किंवा तो भाग इतरांना जाणवू देत नाहीत.
३. घरी सर्व सुखसुविधा उपलब्ध असतांना केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचे लाभलेले प्रेम आणि सेवा अन् साधना व्हावी, यासाठी मायेतून अलिप्त रहाणारे देशमुखकाका !
काका पुष्कळ सधन असल्याने त्यांच्या घरी छोट्या छोट्या कामांसाठीही नोकर होते. त्यांना कोणतेही काम करण्याची सवय नव्हती. देशमुखकाकू (काकांच्या पत्नी – कै. (सौ.) अरुणा देशमुख (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांची) आजारी असल्याने त्यांची आश्रमात येण्याची सिद्धता नव्हती, तरीही काका एकटेच आश्रमात रहायला आले. स्वतःची कामे स्वतः करणे, आश्रमजीवनाशी जुळवून घेणे, हे त्यांनी सहजरित्या स्वीकारले. तेव्हा ‘हेच ते देशमुखकाका आहेत का ?’, याचे मला आश्चर्य वाटले. ते ८ वर्षांपासून रामनाथी आश्रमात राहून सेवा करत आहेत. येथे स्वतःचे सर्व स्वतः करावे लागणे किंवा जेवणातील आवड-नावड, यांविषयी त्यांनी कधीच सांगितले नाही. घरी सर्व सुखसुविधा असतांना केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचे लाभलेले प्रेम आणि सेवा अन् साधना व्हावी, यासाठी ते आश्रमात येऊन राहिले.
४. वयाच्या ७५ व्या वर्षीही ‘सेवा होत नाही’, याची खंत वाटणे
काका काही मासांपासून रुग्णाईत आहेत. ते मला म्हणाले, ‘‘आता माझ्याकडून काही सेवा होत नाही. माझेच इतरांना करावे लागते.’’ त्यांना याविषयी खंत वाटत होती. त्या वेळी मी त्यांना ‘भावजागृतीचे प्रयत्न वाढवा. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील भावक्षण आठवा’, असे सांगितल्यावर त्यांनी ते मनापासून स्वीकारले. ८ दिवसांनी त्यांनी मला त्याचा आढावाही दिला. मी त्यांच्यापेक्षा लहान असूनही त्यांनी माझे ऐकले. तेव्हा मला त्यांच्यातील विनम्रता दिसून आली.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. काकांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे. वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले संभाजीनगर येथे आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी काकांना एखादी चूक कठोरपणे सांगितली, तरी काका ती विनम्रतेने स्वीकारायचे आणि क्षमायाचना करायचे.
आ. परात्पर गुरु डॉक्टर संभाजीनगर येथे विविध संतांच्या भेटी घेत असतांना आणि ते संभाजीनगर येथे आल्यापासून पुढच्या जिल्ह्यात जाईपर्यंत देशमुखकाका त्यांच्या समवेत होते. काकांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे केवळ स्मरण केले किंवा त्यांच्या सत्संगातील ते क्षण आठवले, तरी काकांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळतात.’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२१)