पाटलीपुत्र (बिहार) येथे मूर्तीकाराकडून क्रिकेट खेळणार्या श्री गणेशाच्या मूर्तीची निर्मिती
नृत्य करणार्या बाल श्री गणेशाची मूर्ती साकारल्याने मूर्तीकाराला राष्ट्रीय पुरस्कार घोषित !
- हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचे हिंदूंकडून अशा प्रकारे विडंबन केले जात आहे आणि त्याला सरकारकडून पुरस्कार दिला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! कलेच्या नावाखाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही ! – संपादक
- विविध माध्यमांद्वारे होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
पाटलीपुत्र (बिहार) – विविध रूपांमध्ये श्री गणेशमूर्ती बनवणारे येथील मूर्तीकार पिंटू प्रसाद यांनी यंदाच्या गणेशचतुर्थीच्या निमित्ताने क्रिकेट खेळतांनाची गणेशमूर्ती बनवली आहे. क्रिकेटपटूच्या गणवेशात बनवलेल्या या मूर्तीमध्ये श्री गणपति फलंदाजी करतांना, तर त्याचे वाहन उंदीर गोलंदाजी करतांना दाखवण्यात आले आहे. याआधी प्रसाद यांनी नृत्य करणार्या बाल श्री गणेशाची मूर्ती बनवली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पिंटू प्रसाद हे उपेंद्र महारथी शिल्प संस्थेत ‘सिरेमिक’ कला शिकवतात. त्यांनी यापूर्वी भ्रमणभाषवर ‘सेल्फी’ घेत असलेल्या श्री गणेशाची मूर्तीही बनवली होती.
पिंटू प्रसाद म्हणाले की, वर्ष २०१५ मध्ये मी पलंगावर विश्रांती घेत असलेली गणेशमूर्ती बनवली होती. या मूर्तीसाठी माझी राज्य पुरस्कारासाठी निवड झाली. त्यानंतर लोक माझ्याकडे श्री गणेशमूर्ती बनवण्याची मागणी करू लागले. आतापर्यंत त्यांनी श्री गणेशाच्या १०० हून अधिक मूर्ती बनवल्या आहेत. पिंटू प्रसाद यांना गणपतीच्या मूर्तींमुळे वेगळी ओळख मिळाली आहे.