कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१७ ते २३.६.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत. या नामजपाविषयीचे संशोधन २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/506719.html
‘निर्विचार’, ॐ निर्विचार किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ॐ निर्विचार किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होेतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
कु. सुखदा गंगाधरे
१. १७.६.२०२१ या दिवशी झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती
अ. ‘प्रयोगाच्या दिवशी सकाळपासून मला थकवा जाणवत होता; पण नामजप चालू झाल्यावर ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत आहे’, असे वाटून माझा उत्साह वाढला आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
आ. मी १ – २ घंटे नामजपादी उपाय केल्यावर मला जो परिणाम जाणवतो, तो केवळ १० मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप ऐकल्यावर जाणवला. मला ‘नामजप सतत चालू रहावा’, असे वाटले.
२. २१.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. मला ‘आकाशात नामजप चालू आहे’, असे वाटले.
आ. नामजप करतांना मला जाणवले, ‘नामजप माझ्या मनात जात आहे आणि मनातील विचार न्यून करत आहे. ‘निर्विचार’ या नामजपामध्ये शांती आणि आनंद आहे. नामजपामुळे माझ्या मनातील भावनेचे विचार अन् अस्वस्थता न्यून होत आहे.’
कु. म्रिणालिनी देवघरे
१. १७.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाल्यावर ‘माझ्या शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होत आहे’, असे मला जाणवले.
आ. नामजप ऐकतांना मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शीतलता जाणवून त्या ठिकाणी शांतीची स्पंदने जाणवली. त्यानंतर ५ मिनिटांनी मला माझ्या मणिपुरचक्राच्या ठिकाणी थोड्या संवेदना जाणवल्या.
इ. ‘माझे पूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटले.
२. १९.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. नामजप ऐकतांना माझ्या शरिराची आतून हालचाल होत असल्याचे मला जाणवले. मला सूक्ष्मातून माझी सुषुम्ना नाडी गुलाबी आणि निळी दिसत होती अन् ‘ती वेगाने गोल फिरत आहे’, असे जाणवले.
आ. ‘माझ्या सहस्रारचक्रामधून चैतन्याचा प्रवाह शरिरात येत आहे’, असे मला जाणवले.
३. २३.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. सकाळपासून माझा ‘निर्विचार’ हा जप आपोआप चालू झाला. प्रयोगाच्या वेळी जप चालू झाल्यावर माझे ध्यान लागले आणि ‘त्यातून बाहेर येऊ नये’, असे मला वाटले.
आ. नामजपामध्ये निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात असल्याचे मला जाणवले. नामजप करतांना मला शांतता जाणवत होती.’
४. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)
१. १८.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना मी डोलत होते. त्या वेळी मला हलल्यासारखे वाटत होते.
आ. मला माझ्या डोळ्यांसमोर पिवळा, पांढरा आणि निळा या रंगांचा प्रकाश दिसत होता.
इ. ‘माझे ध्यान लागले आहे’, असे मला जाणवले.
२. २१.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. नामजप करतांना मला जाणवले, ‘परात्पर गुरुदेवांचा एक हात माझ्या मस्तकावर आहे. दुसर्या हातात दैनिक ‘सनातन प्रभात’ धरून ते माझ्या मनातील सर्व विचार काढत आहे आणि माझ्या मनावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट करत आहे.’
आ. ‘श्रीकृष्ण माझे अंतर्मन आणि बाह्यमन यांत असलेले अनावश्यक विचार काढत आहे. तो माझ्या मनात चैतन्याचे गोळे ठेवत आहे. त्यामुळे मला पुष्कळ हलके आणि चैतन्यमय वाटत आहे’, असे मला जाणवले.
इ. हा नामजप करतांना ‘नामजप थांबूच नये. नामजप करतच रहावा’, असे मला वाटत होते.’
कु. मृण्मयी कोथमिरे (वय १९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
१. ‘१७.६.२०२१ या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या ओटीपोटात अकस्मात् वेदना होऊ लागल्या. मला नामजप करण्याची आवश्यकता वाटत होती; पण काहीच सुचत नसल्याने मी पुन्हा झोपले. थोड्या वेळाने मला होणार्या वेदना थांबल्या.
२. प्रयोगाच्या वेळी ‘निर्विचार’ हा नामजप करतांना मला माझ्या मूलाधारचक्राच्या ठिकाणी शीतल संवेदना जाणवल्या.
३. ‘माझ्यावर चैतन्य ओतले जात असून मी सर्व बाजूंनी चैतन्याने न्हाऊन निघत आहे’, असे मला जाणवत होते.
४. मला मनाची स्थिरता पुष्कळ वेळ साधता आली.
५. ‘ध्वनीमुद्रित केलेला आवाज कु. तेजल पात्रीकर यांचा नसून तो नादाप्रमाणे कार्य करत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझे ध्यान लागणे सोपे होत होते. मी १० मिनिटे नामजप केल्यावरही माझी ध्यानावस्था टिकून होती.
६. नामजप करतांना माझ्या मनात अन्य विचार आले, तरी दुसर्या बाजूला ‘नामजपाचा परिणाम आणि त्याच्याशी होणारी एकरूपता’, ही प्रक्रिया चालूच आहे’, असे मला वाटले.
७. ‘सप्तचक्रांवर त्यांच्या आवश्यकतेनुसार नामजपाचा परिणाम होत आहे’, असे मला जाणवले.
८. प्रयोगाच्या कालावधीत नामजपानंतर माझ्या शरिराचे तापमान वाढलेले असायचे.’
श्री. मनोज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
१७.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना आरंभी मला सूक्ष्मातून श्रीविष्णूचे दर्शन झाले. त्याच्या हातातून माझ्यावर प्रकाश पडत होता. त्यानंतर श्रीविष्णु उंच उंच होत गेला. ‘त्याचा मुकुट आकाशाला टेकला आहे आणि चरण पृथ्वीवर आहेत’, असे मला दिसले.
आ. मला ‘पूर्ण आकाशात ‘निर्विचार’ हा नामजप उमटला आहे’, असे दिसले.
इ. ‘श्रीविष्णूने हातात छत्रीच्या आकाराचे काहीतरी धरले आहे आणि त्यावरही ‘निर्विचार’ हा नामजप उमटला आहे’, असे मला दिसले.
१८.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती
अ. नामजप ऐकतांना मला महाभारतातील दृश्याप्रमाणे श्रीकृष्ण रथावर उभा असलेला दिसला.
आ. ‘मी हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘मी एकाच जागेवर बसून आहे आणि माझा सूक्ष्म देह आकाश, दर्या-खोरी अन् पर्वत यांठिकाणी फिरत आहे’, असे मला जाणवले. नंतर माझे ध्यान लागले.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
संकलक – कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२१.८.२०२१)
|