जावळीतील ४० संशयित १० दिवसांसाठी सीमापार !
सातारा, ११ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी सातारा पोलीसदल सज्ज झाले आहे. मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेतील रेकॉर्डवरील ४० संशयितांना १० दिवसांसाठी सीमापार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अमोल माने यांनी प्रस्ताव सिद्ध करून उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे पाठवला होता. सीमापारीचे आदेश मिळालेल्या संशयितांना १० ते १९ सप्टेंबरपर्यंत मेढा पोलीस ठाण्याच्या सीमेत प्रवेश करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रचलिक कायद्यान्वये गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात येईल.