कोयत्याचा धाक दाखवत लुटले ५ लाख रुपये !
समाजाची नैतिकता खालावत चालल्याचे लक्षण ! – संपादक
सातारा, ११ सप्टेंबर (वार्ता.) – फलटण तालुक्यातील तरडगावच्या सीमेत चारचाकी वाहनचालकाला कोयत्याचा धाक दाखवत ५ लाख ३४ सहस्र रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ५ जणांच्या टोळीने हे कृत्य केले असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता तरडगावच्या सीमेत परहर फाट्याजवळील रेल्वेपुलानजीक कृष्णात हरिदास गायकवाड हे त्यांच्या गाडीतून जात होते. रेल्वेपुलाजवळ गाडी हळू चालवत असतांना २ दुचाकीवरून ५ जण आले आणि त्यांनी गायकवाड यांना कोयत्याचा धाक दाखवून गाडीची काच फोडली, तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम, भ्रमणभाष आणि गाडीची किल्ली चोरून नेली.