गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र
कर्णावती (गुजरात) – राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. रूपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यागपत्र सोपवले. स्वतः विजय रूपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गुजरातच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याविषयी मी जनतेचे आणि भाजपचेही आभार मानतो. माझ्या त्यागपत्रामुळे पक्षात नव्या चेहर्यांना संधी आणि दायित्व मिळेल.’’ या वेळी त्यांनी आजवर मिळालेल्या सहकार्याविषयी सर्वांचे आभार मानले. आगामी विधानसभा निवडणूक नव्या चेहर्यासह लढण्याची सिद्धता भाजपाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Gujarat Chief Minister Vijay Rupani resigns from post in Gandhinagarhttps://t.co/murdz4WHDN
— OpIndia.com (@OpIndia_com) September 11, 2021