हरियाणात ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात सरस्वती नदीचा समावेश होणार !
हरियाणातील भाजप शासनाचा आणि कुरुक्षेत्र विद्यापीठाचा अभिनंदनीय निर्णय ! सरस्वती नदीचे आध्यात्मिक महत्त्वही विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
चंडीगड – हरियाणातील भाजप शासनाने आणि कुरूक्षेत्र विद्यापिठाने प्राचीन सरस्वती नदीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ वी ते १० वीच्या मुलांसाठी हा अभ्यासक्रम सिद्ध करण्यात येत आहे. ‘सरस्वती नदीची माहिती मुलांना असली पाहिजे’ हा त्यामागचा हेतू आहे. यासाठी सरकारच्या ‘सरस्वती वारसा विकास मंडळा’ने १ सदस्यांचे अभ्यासक्रम मंडळ नेमले असून त्यात कुरूक्षेत्र विद्यापिठाच्या डॉ. आंबेडकर अभ्यास विभागाचे साहाय्यक प्राध्यापक प्रीतम सिंह हे अभ्यासक्रम मंडळाचे प्रमुख असतील. यापूर्वी हरियाणा सरकारने सरस्वती नदीच्या उत्थानासाठी ११ प्रकल्प राबवले आहेत.