(म्हणे) ‘मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने मी माझ्या बाधवांना साहाय्य करीन !’ – राहुल गांधी
|
जम्मू (जम्मू-काश्मीर) – काल मी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. जेव्हा कधीही मी जम्मू-काश्मीरला येतो, तेव्हा मला असे वाटते की, मी माझ्याच घरी आलो आहे. माझेही कुटुंब काश्मिरी पंडित आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी जे काही बोलेन ते खोटे नसेल. माझे जे भाऊ काश्मिरी पंडित आहेत त्यांना मी साहाय्य करीन, असे फुकाचे आश्वासन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केले. राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीरच्या दौर्यावर आहेत. त्यांनी जम्मूमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
कश्मीरी पंडितों से मुलाकात में बोले राहुल गांधी, ”मैं कश्मीरी पंडित हूं, मेरा परिवार भी कश्मीरी पंडित है” #RahulGandhi pic.twitter.com/89EJHFIQ23
— AajTak (@aajtak) September 10, 2021