अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तीची विटंबना रोखा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूरसह विविध ठिकाणी प्रशासनाला निवेदन सादर
सोलापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – वर्षाचे ३६५ दिवस सांडपाणी आणि घनकचरा यांद्वारे होणार्या भीषण प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘मूर्तीदान’ ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध ठिकाणी देण्यात आले.
येथील महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री धनंजय बोकडे, शिवाजी चिंता, बालराज दोंतुल, दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.
१. लातूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गणेश पाटील यांनी लातूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका येथे निवेदन दिले. या निवेदनावर सर्वश्री प्रशांत रितापुरे, कैलास यादव, अमोल चिलरगे, सौ. अंजली पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.
२. अंबेजोगाई (जिल्हा बीड) – येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश बारस्कर यांनी नगरपालिका कार्यालयात संगणकीय पत्राद्वारे निवेदन पाठवले.